Sunday, 15 January 2017

कट्टा4करिअर


Hello friends,

                      आपले कट्टा4करिअर या ब्लॉगमधे स्वागत आहे. हा ब्लॉग बनवण्यामागचा उद्देश हाच की  आपल्याला १०वी व १२वी नंतर उपलब्ध असणारे पर्याय व त्यासाठी लागणारी माहिती आपणास कळावी.
प्रत्येक व्यकी हा स्वप्न पाहत असतो आणि प्रत्येकाला ते सत्यात उतरवायचे असतात आणि प्रत्येक जण हा त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. पण गरज असते ती उत्तम अश्या मार्गदर्शनाची. यासाठी मी हा ब्लॉग बनवला आहे. मित्रांनो सगळे मुले हे आपल्या वातावरणात मोठे झालेले असतात. काही ग्रामीण असतात तर काही शहरी भागातील असतात आणि ज्याचे जसे वातावण असते तसे  आपल्याला १० वी व १२वी नंतर प्रवेश कुठे व कसा  घ्यावा याची माहिती हवी असते.त्यासाठी मी आपल्याला  प्रवेश प्रकीयेसंबंधी लागणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आशा करतो कि आपल्याला लागणारी सर्व माहिती माझ्या कट्टा4करिअर या ब्लॉग द्वारे प्राप्त होईल. आणि आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्याला खूप साऱ्या  शुभेच्छा.
  

Sunday, 8 January 2017

मार्गदर्शन

                             बरेच विद्यार्थी 10 वीनंतर आपल्या करिअरचा विचार करतात. आपण 9 वी -10 वीत खूप अभ्यासाच्या मागे लागतो. अभ्यास केलाही पाहिजे; पण आपण मोठे झाल्यावर कोण होणार याचाही विचार तेव्हाच करायला हवा. मोठे झाल्यावर तुम्ही नोकरी, व्यवसाय करणार असता. त्यालाच करिअर म्हणतात. या दृष्टीने त्या त्या क्षेत्रातले शिक्षण घ्यावे लागते. करिअर वाटा या सदरात आपण त्याची माहिती घेणार आहोत. 
10 वीनंतर कला, विज्ञान, वाणिज्य याबरोबरच इतरही शाखांतून प्रवेश घेऊन करिअर घडवता येते. एकूण 620 विषयांत बी.ए. करता येते. 150 विषयांत आपण कॉमर्सचे शिक्षण घेऊ शकतो, तर 110 विषयांत इील- चील करू शकतो; तसेच इतर क्षेत्रांतील 84 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात फारसा रस नाही किंवा घरच्या परिस्थितीमुळे लवकर पायावर उभे राहायचे आहे त्यांच्यासाठी 10 वी -12 वीनंतर विविध कोर्सेस आहेत. वीस तऱ्हेने आपण वैद्यकीय शाखेतील शिक्षण घेऊ शकतो. 53 तऱ्हेने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ शकतो. 
मित्रांनो, आपण कोणत्या विषयात हुशार आहोत हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक अशा टेस्ट करता येतात. पदार्थ विज्ञान-गणित-केमिस्ट्री यातली हुशारी म्हणजे हुशारी नव्हे; पण दुर्दैवाने तुम्हाला व तुमच्या पालकांना वाटतं, की हुशारी म्हणजे सायन्समधली हुशारी! वास्तविक हुशारी दोन तऱ्हेची असते. एक आपला खट ( बुध्यांक ) ( विज्ञान-गणित अशा विषयातील हुशारी ) चांगला असतो वा आपला वा आपला एट (भावनांक) (कला-क्रीडा-उद्योजकता-चित्र-नृत्य-नाट्य-शिल्प वगैरेत) चांगला असतो. आपण 8 वी ते 10 वीतच मानसोपचारतज्ञांकडे जाऊन आपला खट आणि एट तपासला तर आपण कुठल्या क्षेत्रात हुशार आहोत, हे आपल्या लक्षात येऊ शकते. 
सोप्पा रस्ता कोणता? मित्रहो, कोणाला खुशवंत सिंग यांच्याप्रमाणे पत्रकार व्हायचे असते, तर कोणाला भीमसेनजी/ लता दीदी यांच्याप्रमाणे गायक व्हायचे असते. कोणाला भरतनाट्यम/ कुचिपुडी वैगेरे नृत्यप्रकारांत रस असतो वा कोणाला किरण बेदींप्रमाणे खअड/खझड अधिकारी व्हायचे असते. तर कोणाला सायन्टिस्ट व्हायचे असते; पण आपल्याला कशात रस आहे हे आपल्यालाच कळलं पाहिजे. पुढे जाऊन आपण काय इच्छितो यावर 8 वी ते 10 वी पासूनच विचार करा आणि मग त्याची माहिती मिळवा. 
समजा तुम्हाला इंजिनिअर व्हायचे आहे तर आयटी, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्‍टॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल वगेरे 53 तऱ्हेचे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. त्यांची माहिती मिळवा. त्यासाठी ओळखीच्या इंजिनिअरशी चर्चा करा नेटवरून माहिती मिळवा. आणि मग यापैकी कोणते काम आपल्याला आवडेल याचा निर्णय घ्या. फक्त परीक्षेचा विचार करू नका. 
सर्वच क्षेत्रांत स्पर्धा भरपूर असल्याने आजचे युग हे स्पर्धात्मक युग झालेले आहे. प्रचंड लोकसंख्येमुळे नोकरीच्या संधी कमी होत आहेत. तेव्हा तुम्ही जेव्हा नोकरीच्या शोधात असाल तेव्हा तुमच्याच वयाची किती तरी मुलं-मुली नोकरीच्या शोधात असतील. म्हणून आपण विविध शाखांचा विचार करायला हवा. आपल्या आवडीच्या शाखेचा विचार करताना आपल्या जिल्ह्यात त्या करिअरशी संबंधित कोणती महाविद्यालये आहेत, याची माहिती घेतली पाहिजे